जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिनानिमित्त वाशीमध्ये जनजागृती 

नवी मुंबई : नवी मुंबईतील अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, नशाबंदी मंडळ, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांच्या वतीने वाशी येथील शिवाजी चौकात 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनाविषयी जनजागृती करण्यात आली.  

यावेळी तंबाखू सेवन याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. त्यानंतर प्रजापिता ब्रम्हाकुमारीज याच्यातर्फे व्यसनराज  हे पथनाट्य सादर करण्यात आले. नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या वतीने अत्यंत प्रभावी, जोशपूर्ण असे असुरों की महफिल हे पथनाट्य १५ तरुणांनी सादर केले. या पथनाट्याची  संकल्पना वासंती भगत यांची तर लेखन, दिग्दर्शन लव शर्मा या कलाकाराचे होते. दोन्ही पथनाट्याचा आशय हा देशातील वाढती व्यसनाधीनता व त्यात भरडून निघणारी तरुणाई हा होता. 

याप्रसंगी ब्रम्हाकुमारीच्या शीला दीदी, शुभांगी दिदी, अन्वयचे सर्व समुपदेशक कार्यकर्ते पुष्पा कांबळे, अन्वयचे नयन म्हात्रे, मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, उदय तिळवे, अनिल लाड, वृषाली मगदूम, डॉ. अजित मगदूम, ममता समर्थ, लता कोठावळे, नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते आदींसह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आठ तास ड्युटीमुळे  महिला पोलीस कर्मचारी समाधानी