सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई इंटक सल्लग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कार्याचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

महापालिका मुख्यालयातील वाहन विभागात झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभ कार्यक्रमात भानुदास दोडके, शिवाजी दातीर, बाळू घावट, अनिल चव्हाण, माणिक राऊत, महेंद्र कांबळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी सांगितले की, कर्मचारी सेवानिवृत्त होतील, त्याच दिवशी त्या कर्मचाऱ्याच्या हिशोबाचा धनादेश पालिका प्रशासनाने द्यावा, जेणेकरून आपल्या हक्काच्या रकमेसाठी कर्मचाऱ्याला प्रशासन दरबारी हेलपाटे मारण्याची व चपला झिजविण्याची वेळ येवू नये, ही आपली प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी आपला गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा सुरू असून पालिका प्रशासनाला लवकरच हा निर्णय घेण्यास भाग पाडू असे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वाहन चालक  युनिटचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, उपाध्यक्ष कृष्णा घनवट, फायर युनिटचे अध्यक्ष कोकाटे, कुणाल खैरे उपस्थित होते. सुशील तांबे ,जाधव,इतर अधिकारी व सर्व व्हान चालक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरण सप्ताह निमित्ताने करंजा टर्मिनलने केले वृक्षारोपण