द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा, जेएनपीटी पोर्ट व हेटवणे गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार

नवी मुंबई - शुक्रवार दिनांक 03 जून 2022 रोजी सिडकोचा हेटवणे धरणावरील विमोचक, मुख्य जलवाहिनी आणि जिते जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी हेटवणे धरणामधून तसेच जलशुध्दीकरण केंद्र येथून होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सिडकोच्या द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा व जे.एन.पी.टी. पोर्ट विभागांतील तसेच हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांचा पाणी पुरवठा शुक्रवार, दिनांक 03 जून 2022 रोजी संध्याकाळी 7.00 वाजेपासून ते शनिवार, दिनांक 04 जून 2022 रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत  बंद राहणार आहे. तसेच रविवार, दिनांक 05 जून 2022 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नोंद घ्यावी.

तरी या कालावधीत उपरोक्त परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून पाण्याचा जपून वापर करावा आणि सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांकडून मैदानांचा व्यावसायिक वापर