नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत

नवी मुंबई - महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी, अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यात अनुसूचित जाती -जमाती सह सर्वसामान्य महिला असे एकुण,५० टक्के आरक्षण महिलांना जाहीर झाल्याने, महापालिकेत महिला राज चा मार्ग मोकळा झाला आहे.

     कोविड संसर्गामुळे तब्बल दोन वर्षे पुढे सरकलेलेली नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वजण्यास सुरुवात झाली आहे. प्रथमच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहूसदस्य (पँनल) पद्धतीने घेण्यात येणार आहे. लोकसंख्ये आणि भौगोलिक परिस्थिती नुसार ,४१ पँनल तयार करण्यात आले आहेत.

अ, ब, क नुसार त्रिसदस्य पँनल मधिल प्रभाग अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसामान्य महिलांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली यातअनुसूचित जाती महिला-६,अनुसूचित जमाती महिला-१ आणि सर्वसामान्य गटातील महिलांसाठी -५४ असे ६१ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेचं, १०९ प्रभाग सर्वासाठी खुला वर्गातील महिला पुरुष यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

  स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुकीत महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असताना, नवी मुंबई महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत अस्तित्वात असलेल्या १२२ प्रभागांपैकी अनुसूचित जाती जमाती आणि सर्वसामान्य महिला यांच्या साठी तब्बल ६१ प्रभाग आरक्षित प्रभाग व्यतिरिक्त सर्वसामान्य वर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागांतून खुल्या प्रवर्गातील महिला निवडणूक लढवू शक्यतात सध्या राज्यात सुरू असलेली राजकीय परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ,आपल्या कुटूंबातील महिलांना निवडणूक रिगनात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने, सर्वच पक्षातील नेते आपल्या कुटूंबातील महिलाना निवडणुकीच्या रिंगणात उतरून महापौर पदांची स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतील अशी चर्चा सुरू आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर 2022 कार्यरत