खाडीतील वाढत्या जलप्रदूषणामुळे मासेमारी धोक्यात

नवी मुंबई : वाशी खाडीत मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमणावर पाण्यातील  जल प्रदुषनामुळे  मासेमारी धोक्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपास मारीची वेळ आली आहे. एमआयडीसी आणि सिडको येण्याअगोदर नवी मुंबईतील सर्वच गाववातील ग्रामस्थ मासेमारीचा व्यवसाय करत होते. मात्र एमआयडीसी मधून रसायनयुक्त पाणी सोडल्याने  माशांची संख्या घटत चालली आहे. वाशी खाडीत कोणतीही प्रक्रिया न करता तसेच रासायनिक मिश्रित पाण्याची पाईपलाईनला गळती लागली असून ते पाणी थेट खाडीत मिसळले जात आहे. त्यामुळे वनशक्ती संस्थेने या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून प्रदूषण मंडळाकडे कारवाई करण्याबाबत तक्रार करण्यात येत आहे.

पहिले एमआयडीसीने आणि नंतर सिडकाेने नवी मुंबईतील भूमीपुत्रांची १००% जमीन संपादित केल्यानंतर काही गावातील खाडी किनारे संपल्याने मासेमारीचा व्यवसाय बंद झाला. तर काही गावालगत खाडी किनारे शिल्लक राहिले. त्यात दिवाळे गाव, सारसोळे गाव, वाशी गाव, तळवली आणि दिवा गाव अशा मोजक्या गावांशेजारीच खाडी किनारे शिल्लक राहिले आहेत. या गावातील नागरीक मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. नवी मुंबईत पूर्वेला एमआयडीसी भाग असून त्यात रासायनिक कंपन्या आहेत. मात्र त्यातील बऱ्याच कंपन्या या सांडपाण्यावर प्रकिया न करता  रासायनिक मिश्रित पाणी तसेच नाल्यात सोडत असल्याचे मत मच्छीमारांनी व्यक्त केले आहे. एमआयडीसीचे सांडपाणी सोडणारे  सर्व नाले हे खाडीला मिळाले आहेत. रासायनिक मिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने ते पाणी सरळ खाडीत जाऊन खाडीतील पाण्यात जल प्रदूषण वाढत आहे. वाशी खाडीत पाइपलाइन गळीती झालेले रासायनिकयुक्त पाणी मिसळत आहे. पावसाळ्यात माशांच्या प्रजनाचा कालावधी असतो या काळात त्याठिकाणी जलप्रदूषणाने त्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर कारवाई करावी अशी मागणी वनशक्ती संस्थेच्यावतींने करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2022 ची आरक्षण सोडत संपन्न