रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमे

पनवेल : सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा गुरुवार दिनांक ०२ जून रोजी ७१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी येणाऱ्या हितचिंतक शुभेच्छुकांनी पनवेल येथील निवासस्थानी किंवा कार्यालयात न येता ०२ जून रोजी न्हावा खाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, रुग्णवाहिका लोकार्पण, संस्कृतीचे दर्शन असलेल्या 'मी मराठी' कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.  

      राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून  रामशेठ ठाकूर यांचा सुपरिचय आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गरीब गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. गेल्या चार दशकात त्यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायमच भरीव योगदान दिले आहे. आणि त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील लोकांचे प्रेम आहे व तो नेहमीच वृद्धिंगत झाला आहे.  त्या अनुषंगाने ०२ जून रोजी न्हावा खाडी येथील म्हसेश्वर मंदिराशेजारील क्रिकेट मैदानावर सायंकाळी ०६ वाजता रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यादरम्यान ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५. ३० वाजता आमदार महेश बालदी यांच्यावतीने उलवा नोड करिता देण्यात येणा-या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०७ वाजता महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित लोककलांतून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या 'मी मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी पनवेल येथील निवासस्थानी किंवा कार्यालयात न येता ०२ जून रोजी न्हावा खाडी येथे होणाऱ्या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खाडीतील वाढत्या जलप्रदूषणामुळे मासेमारी धोक्यात