राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खारघर मध्ये  सॅनिटरी पॅडचे वाटप  

खारघर :  मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा  उपाध्यक्ष  सुरेशभाऊ रांजवण यांच्या तर्फे  खारघर मधील गरीब व गरजू महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या  युवती जिल्हा अध्यक्ष पद्मा  चव्हाण, खारघरच्या अध्यक्षा रेणुका पगारे,  खारघर महिला शहर अध्यक्ष राजेश्री कदम तसेच पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर विधानसभा अध्यक्ष डॉ.  विजय चव्हाण, बळीराम नेटकेयुवक  सचिन पवार  राहुल कोळी इतर खारघरमधील महिला पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी पद्मा चव्हाण आणि राजश्री कदम यांनी खारघर मधील झोपडपट्टीतील  महिलांमध्ये सॅनिटरी पॅड बाबतचे महत्व पटवून देण्यात आले.तर सुरेश रांजवन यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ०५ जूनला उलवा नोडमध्ये 'भव्य सायक्लोथॉन स्पर्धा'