युवासेनामुळे हेदोरावाडी पाड्यातील वीज आणि पाणी समस्या दूर 

खारघर : युवा सेनेच्या प्रयत्नामुळे खारघर मधील हेदोरावाडीआदिवासी पाड्यात पथदिवे आणि पाणी समस्या दूर झाल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे. पथदिव्यांचे लोकार्पण शनिवारी पार पडले या वेळी  यावेळी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत , शिवसेना पनवेल उपजिल्हा संघटक परेश पाटील,तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील , खारघर विभाग संघटक रामचंद्र देवरे , बारवईचे सरपंच निलेश बाबरे, युवासेनाचे मिथुन पाटील , तसेच वाडीतील ग्रामस्थ गुरुनाथ सपरे , भगवान सपरे, बाबु नाईक , जयराम सपरे , रमेश पारधी, शनिवार सपरे, यशवंत पारधी आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

       खारघर शहरात फणसवाडी, चाफेवाडी, बेलपाडा वाडी, हेदोरावाडी, धामोळे, घोलवाडी आदी पाडे आहेत. ग्रामपंचायत काळात पाड्यातील समस्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोडविले जात असे, मात्र पनवेल पालिका अस्तित्वात आल्यानंतर आदिवासीपाडे नागरी सुविधा पासून वंचित आहे. पाणी तसेच पथदिव्यांची समस्या दूर कराव्यात, मालमत्ता कर कमी करावेत यासाठी अवचित राऊत  यांनी पाड्यातील ग्रामस्थांना सोबत घेवुन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी आयुक्तांनी आदिवासी पाड्यातील समस्या दूर केली जाईल असे आश्वासन दिले होते. अखेर पालिकेने  हेदोरावाडी पाड्यातील  एक वर्षापासुन बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आले तसेच पाड्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर व वीज मीटर आठ महिन्यापासून बंद होते. दुरुस्ती करण्यात आल्याने पाड्यात पाणी पुरवठा सुरळीत झाला. आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर समस्या तात्काळ दूर केल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खारघर मध्ये  सॅनिटरी पॅडचे वाटप