शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा - भाजपचे पोलिसांना पत्र
खारघर : दीपाली सय्यद यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. त्याबद्दल दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे मागणी पत्र खारघर भाजपच्या महिला अध्यक्षा वनिता पाटील तसेच भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शहर चिटणीस दीपक शिंदे आणि कीर्ती नवघरे यांनी खारघर पोलिसांना दिले आहे. दीपाली सय्यद यांची बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. त्यात त्या म्हणतात की, भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. तसेच किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह विधान केले आहे. दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ति नवघरे, जिल्हा उपाध्यक्षा संध्या सारबिंदरे, मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, मंड़ल उपाध्यक्ष संजय घरत, सरचिटणीस साधना पवार, उत्तर रायगड जिल्हा सोशल मिडीया संयोजिका मोना अडवाणी, ओबीसी मोर्चा सहसंयोजिका वैशाली प्रजापति, महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, कामगार सेल संयोजक जयदास तेलवने, मंडल चिटणीस सचिन वासकर, तालुका संघटक प्रभाकर जोशी, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकुर, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, सेक्टर-20 अध्यक्ष विलास आलेकर, अशोक जांगिड़, शैलेन्द्र त्रिपाठी, जी एन गुप्ता, सुस्मित डोलस इत्यादी उपस्थित होते.