नवी मुंबई : कॉम्प्लेक्ससिटी महोत्सवाअंतर्गत खारघर येथील युवा सेंटरमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत मावा ग्रुपने बाजी मारत प्रथम क्रमांक तर बाल अधिकार संघटनेने दुसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही विजेत्या ग्रुपला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या पथनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
युवा संस्थेच्या माध्यमातून 2018 पासून कॉम्प्लेक्ससिटी हा महोत्सव भरविण्यात येत असून या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी मुंबई : शहर सबका या विषयावर कॉम्प्लेक्ससिटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात थिएटर परफॉर्मन्स, युवा संमेलन, युवा स्पर्धा (फोटोग्राफी आणि पथनाट्य), चित्रपट प्रदर्शन, इंस्टाग्राम वरील संवाद असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. युवा स्पर्धेच्या निमित्ताने शनिवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मुंबई-नवी मुंबई व वसई-विरार भागातील अनुभव सांस्कृतीक कट्टा, प्रेरणा ग्रुप, आगाझ युथ ग्रुप, मालवणी युथ परिषद, यश थिएटर, जागृती ग्रुप, मावा, बाल अधीकार संघटना हे 8 ग्रुप सहभागी झाले होते. या सर्व ग्रुफ्सने पथनाट्यच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपली कला व भूमिका मांडून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत मावा ग्रुपने बाजी मारत प्रथम क्रमांक तर बाल अधिकार संघटनेने दुसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही विजेत्या ग्रुपला प्रमुख पाहुणे तथा या स्पर्धेचे परिक्षक अभिनेते व दिग्दर्शक जॉय फर्नांडीस तसेच दिग्दर्शक, लेखक थिएटर आर्टीस्ट दिव्या भाटीया यांच्या हस्ते ट्रॉफि व प्रमाणपत्र देऊन विजेत्या गटांचा सन्मान करण्यात आला.