एपीएमसी बाजारात देवगड हापुस दखल

नवी मुंबई--: सरासरी फेब्रुवारी महिन्यात वाशीच्या एपीएमसी बाजारात कोकणातील हापुस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होत असते. मात्र यंदा डिसेंम्बरच्या तिसऱ्या आठवड्यात देवगडचा हापुस आंबा बाजारात दाखल झाला आहे.  त्यामुळे आता हापुसचा गोडवा चाखण्यासाठी ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही बाजारात हापुस ५ पेट्या दाखल झाल्या असून  एका पेटीला २  ते ५ हजार दर अपेक्षीत आहे  असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

दरवर्षी एपीएमसी बाजारात फेब्रुवारी महिण्यात हापुस आंब्याच्या आवकीला सुरुवात होते व नंतर मार्च ,एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून  मुख्य हंगाम जोर पकडतो. २०१९ ला हापुस हंगामाला सुरूवात होताच

मुख्य हंगामाला सुरवात  कोरोना आजाराचे थैमान घातले आणि लॉकडाऊन जाहीर झाले. आणि लोकडाउन मुळे वाहतुक बंद असल्याने तुरळक आवक झाल्याने  हापूस चा मोठा हंगाम वाया गेला व शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागले.२०२० मध्ये हापुस आंब्याला चांगला प्रतिसाद मिळाला .मात्र यंदा अवकाळी पाऊस आल्याने जवळपास ८०%मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सध्या हापुसच्या मुख्य हंगामाला जरी सुरुवात झाली नाली  अरविंद वाळके ,वाळकेवाडी देवगड येथून हापुस च्या पाच पेट्या वाशीतील एपीएमसी बाजारात दाखल झाल्याने कोकणातील ही पहिली खेप  आहे. आणि या आंब्याला सरासरी २ ते ५ हजार दर अपेक्षीत आहे.असे मत फळ मार्केट मधील व्यापारी व संचालक  संजय पानसरे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Read Next

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन