दिवाळीनंतर लाचलुचपत विभागाचे कारवाईचे फटाके

नवी मुंबई :- दिवाळी ऐन तोंडावर असताना पार्लर वरील अतिक्रमण करवाई टाळण्यासाठी आणि एल बी टी कमी करण्यासाठी  लाच मागितली म्हणून सापळा रचून लाचलुचपत खात्याने कारवाई केल्या.मात्र या कारवाई मुळे  मनपा प्रशासनातील भुजंग अधिकारी धास्तावले असतानाच आता लाचलुचपत विभागाच्या रडारवर संबंधित विभागाचे बडे अधिकारी आले आहेत.

बेलापूर येथे गेल्या आठवड्यात पार्लर वरील अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.या कारवाई नंतर वर कमाई करणाऱ्या लोभी अधिकाऱ्यांनी काही दिवस लाच घेण्याच्या कार्याला तिलांजली दिली.मात्र या कारवाईचे पेपर पूर्ण रंगत नाही त्या अवधीत औद्योगिक वसाहती मधील जुना एल बी टी कर चौदा लाखावरून कमी करून देण्यासाठी लाच घेताना आणखी एक कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. या मध्ये सबंधित कर्मचाऱ्याला पोलिस कोठडी झाली असून त्याच्या चौकशीत अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून या अधिकाऱ्यांना आता चौकशी साठी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाची पायरी चढावी लागणार आहे.लाचलुचपत विभागाने कारवाई केलेले मासे छोटे असून आता बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागणार आहेत.या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.या चौकशीत अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता असून या अधिकाऱ्यांना तपासासाठी बोलवले जाणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेतील  एल बी टी कमी करण्यासाठी लाच घेताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्या नंतर आता एलबीटी विभागातील बंदूक अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.याच प्रकारे महापालिका स्थापत्य विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. आधी मार्जितल्या ठेकेदारांकडुन कामे करवून घेतली जातात व नंतर त्याकामांच्या निविदा  काढल्या जात आहेत.त्यामुळे अशा  कामात मोठा भ्रष्टाचार  असल्याची पाहता या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ठाणे लाच लुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.त्यामुळे स्थापत्य आता विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती होणार आहे.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

घणसोली गावात १५ लाख ४८ हजाराची घरफोडी