मनपा निवडणूक घोषित होण्यापूर्वी आप पक्षाकडून ५० जणांची संभाव्य उमेद्वारांची यादी जाहीर
नवी मुंबई-:नवी मुंबई मनपा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत.आप या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ५० जणांची अर्थात संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करून या निवडणुकीचे पडघम वाजवत आघाडी घेतली आहे.
नवी मुंबई मनपाची मुदत २०२० मध्ये मे महिन्यात संपली मात्र अचानक कोव्हींडचा संसर्ग बळवल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रभाग रचना आणि आरक्षण घोषित करण्यात आले होते.एकूण १११ प्रभागांची सगळी तयारी पूर्ण करून फक्त मतदानाचा दिवस घोषित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचा विळखा पडल्याने निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली.दरम्यान कोरोनामध्ये इचुका उमेदवारांनी धान्य ,सनिटायझर,मास्क वाटप करण्याबरोबरच फवारणी अश्या विविध आरोग्य कार्याला खुल्या हाताने खर्च करून सेवाभाव दाखवला.अचानक शासनाने या महिन्यात बहुप्रभाग अर्थात पॅनल पद्धतीची घोषणा केल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.पूर्वीच्या १११ तुलनेत आता १२२ प्रभाग जाहीर करण्यात आल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार असून या अनुषंगाने आप पक्षाने सुमारे पन्नास संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करून बाजी मारलेली आहे. महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता असल्याने या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादी मार्फत आमदार शशिकांत शिंदे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेनेत पालकमंत्री एकनाथ शिंदे उपनेते विजय नाहटा यांची भूमिका महत्वाची असणार आहे.तर भाजपमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या हाती सर्व सूत्र असणार आहेत.प्रभाग रचना आरक्षण पद्धत जाहीर होण्या अगोदरच निवडणुकीसाठी इच्छुक उमेद्वार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.यात आप ने पन्नास जणांची प्रभाग प्रतिनिधी म्हणून यादी जाहीर केल्याने निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे संकेत दिले आहेत.