महापे ग्रामस्थांच्या आंदोलनाला अखेर यश

नवी मुंबई-:महापे गावात मागील आठवड्यात सलग चार दिवस पाणी येत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर  आंदोलन करत एमआयडीसी व महापालिका अधिकाऱ्यांना सोमवारी  जाब विचारत धारेवर धरले होते.आणि याची दखल घेत मनपाकडुन महापे गावातील पाण्याच्या टाकीत तात्काळ टँकरने पाणी पुरवला तर एमआयडीसीकडून  देखील नळाला पाणी सोडल्याने महापे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

 महापे गावात पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई नेहमीच जाणवत असते. गेल्या वर्षभरापासून पाण्याची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. पूर्वी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत गावात पाणी सोडले

आहे. मात्र आता एमआयडीसीकडून मिळणारे पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे. तर गावाची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाणही वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशातच मागील आठवड्यात बुधवार पासून सलग चार दिवस  नळाला पाणी येत नसल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन पाण्या वीना नागरीकांचे हाल होत होते.याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन कुठलीच दाद देत नाही.त्यामुळे महापे ग्रामस्थानी अखेर सोमवारी आंदोलन करत महापे येथील एमयडीसी कार्यालायातील व महानगर पालीकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला..आणि प्रशासनाकडून याची दखल घेत मनपाकडुन महापे गावातील पाण्याच्या टाकीत तात्काळ टँकरने पाणी पुरवला तर एमआयडीसीकडून  देखील नळाला पाणी सोडल्याने महापे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे महापे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचा जे.एन.पी.टी.-सिडको परीसरामध्ये पाहणी दौरा संपन्न