इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये जलतरणपटू मंत्रा कुऱ्हेच्या विक्रमाची नोंद
नवी मुंबई-:नवी मुंबईकर जलतरणपटू मंत्रा मंगेश कुर्हे हिने २ तास ५१ मिनिटांत एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १५ किमीचे सागरी अंतर कापून मुलींमध्ये सर्वात कमी वेळात हे अंतर पोहून जाण्याचा विक्रम केला होता. सदर विक्रमाची नोंद इडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली असून मंगळवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रा हिला पुष्पगुच्छ देवून तिचा गौरव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाशी येथील फादर आग्नेल शाळेत इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी ११ वर्षीय मंत्रा मंगेश कुर्हे ही वयाच्या चौथ्या वर्षापासून फादर अग्नेल स्विमिंगपूलचे कोच अमित आवळे,प्रमुख मार्गदर्शक गोकुळ कामथ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे.फेब्रुवारी महिन्यात केवळ १५ दिवसांत आठवड्यातून दोन वेळा याप्रमाणे २ आठवड्यात ४ वेळा प्रत्येकी ३तास फादर आग्नेल क्लब स्विमिंगपूल आणि एकदा तिने उरणच्या समुद्रात सतत २ तास पोहण्याचा सराव करून मंत्राने २१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ०१मिनिटला एलिफंटा येथून समुद्रात झेप घेतली व सकाळी ८वाजून ५२ मिनिट वाजता तिने गेटवे ऑफ इंडिया हे १५ किमीचे सागरी अंतर २तास ५१ मिनिटांत पोहून तिने मुलींमध्ये सर्वात कमी वेळेत हे अंतर कापण्याचा विक्रम केला होता..आणि तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली आहे. याबद्दल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी मंगळवार २८ सप्टेंबर रोजी मंत्रा हिचे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मंत्राचे वडील मंगेश कुऱ्हे आणि आई डॉक्टर तृप्ती कुऱ्हे उपस्थित होत्या.