वायू गळतीच्या वासाने नवी मुंबईकर भयभीत

नवी मुंबई-:मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी नेरुळ ,जुईनगर बेलापूर,परिसरात वायू गळतीच्या उग्र वासाने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.सदर वास हा महानगर गॅस चा असल्याचे नागरीकांकडून सांगण्यात येत होते. मात्र महानगर गॅसला नवी मुंबईत कुठेही गळती नसल्याचे महानगर गॅस ने स्पष्ट केले तर सदर वास हा मुंबईतील चेंबुर परिसरातुन येत असल्याचे महानगर पालिका आपत्कालीन  विभागाकडून सांगण्यात आले.

नवी मुंबई शहारत पावसाली दिवसात औद्योगिक कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात रासायनिक वायु सोडल्याच्या टँकर नेहमीच येत असतात.अशातच मंगळवार दिनांक २८सप्टेंबर रोजी नेरुळ, जुईनगर, बेलापूर खारघर भागात  दुपारच्या सुमारास उग्र वास येत असल्याने  नागरीक भयभीत झाले होते.सदर वास हा महानगर गॅस असल्याचा अंदाज बांधत नागरिकांनी देखील महानगर गॅस कडे तक्रारी केल्या.तसेच महापालिका प्रशासन सोबत संपर्क साधला.त्यानंतर महानगर गॅस आणि नवी मुंबई अग्निशमन दलाकडून नेरुळ, जुईनगर,बेलापूर भागात कुठे गॅस गळती आहे का याची तपासणी करण्यात आली. मात्र नवी मुंबईत महानगर गॅस ची कुठेही गॅस गळती झाली नसल्याचे महानगर गॅस ली.प्रशासनाकडुन सांगण्यात आले. तर सदर गॅसचा वास हा नवी मुंबईतुन नसून मुंबई मधील चेंबूर भागातून येत असल्याचे नवी मुंबई मनपा आपत्कालीन कक्षा कडून सांगन्यात आले.मात्र सदर उग्र वासाने नवी मुंबईकरांचा जीव  मात्र टांगनीला लागला होता.

 

Read Previous

‘जुन्नर’चा केशर आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल

Read Next

संत निरंकारी मिशनकडून ठाणे येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न