गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपर्यंत
ठाणे दि.27 (जिमाका) :- बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील 1 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.
भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 सप्टेंबर ते 01 ऑक्टोंबर या कालावधीत कोकण किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे सर्व मच्छिमार बांधवांना व समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधनतेचा इशारा देण्यात आला, असे श्री. परदेशी यांनी कळविले आहे.