सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामांना सूट ?
नवी मुंबई-:नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून घणसोली विभाग अशा बांधकामांचे हब बनत चालले असून याबाबत नागरीकांनी तकारी केल्यानंतर बांधकाम निष्कासन करण्याऐवजी बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे उत्तर देण्यात येत असून प्रत्यक्ष बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.त्यामुळे गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामांना सूट देण्याचे नवीन अर्थपूर्ण धोरण नवी मुंबई महानगर पालिकेने आखले आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आजमितीला बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. आणि सदर बांधकामे रोखण्यासाठी मनपा आयुक्त वेळोवेळी आदेश देत आहेत.मात्र सदर आदेशांची सर्रास पणे पायमल्ली होताना दिसत असून नागरीकांच्या तक्रारींना देखील दिशाभूल करणारी उत्तरे मनपाकडून दीली जात असुन अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात आहे.आणि या अनधिकृत बांधकामांत घणसोली विभाग आघाडीवर आहे.या भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर संभदितांवर गुन्हे दाखल केल्याचे उत्तर दिले जाते.मात्र प्रत्यक्षात बांधकांवर कारवाई होत नाही.आणि कारवाई केलीच तर ती थातूर मातूर दिखाव्याची कारवाई केली जाते.मात्र त्यानंतर ती बांधकामे परत उभु राहत आहेत. त्यामुळे नागरीकांच्या तक्रारींची वाट न बघता अनधिकृत बांधकामांवर सरसकट कारवाई करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशाला बासनात गुंडाळून अधिकाऱ्यांकडुन अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात आहे. तर नागरीकांनी तकारी केल्यानंतर बांधकाम निष्कासन करण्याऐवजी बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे उत्तर देण्यात येत असून प्रत्यक्ष बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.त्यामुळे गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामांना सूट देण्याचे नवीन अर्थपूर्ण धोरण नवी मुंबई महानगर पालिकेने आखले आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.