खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

 सिडको महामंडळाकडून खारघरउलवे आणि द्रोणागिरी नोडमधील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या देखभालीच्या कामांसाठी दिनांक 19 सप्टेंबर 2021 पासून काही कालावधीसाठी दर आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित नोडमधील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

 याबाबतचे वेळापत्रक सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले असूनया वेळापत्रकानुसार द्रोणागिरी व मजीप्र (जेएनपीटी) येथे दर रविवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, खारघर नोडमध्ये दर सोमवारी सकाळी 08.00 ते मंगळवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंतउलवे नोडमध्ये दर मंगळवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईलयाची नागरिकांनी नोंद घ्यावी व आदल्या दिवशी पुरेसा पाणी साठा करून सिडकोस सहकार्य करावेअसे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

कोपरखैरणे बस स्थानकाला आले वाहनतळ स्वरूप