९ फेब्रुवारी रोजी युवा सेना तर्फे राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन' कार्यक्रम
३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान
ठाणे : शिवसेनाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवा सेना तर्फे येत्या ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन' साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवा सेना तर्फे केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवा सेना तर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, युवा वर्ग आणि विद्यार्थी या प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे सातत्याने करत आहेत. ‘सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी' या उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या ब्रीदवाक्याला शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. याच जाणिवेतून उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी २०२५ दिवस ‘कॉमन मॅन दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संकल्पनेव्दारे युवा सेना तर्फे राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅन'चा अर्थात सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या ६१ सन्मानमूर्तींमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटीत कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन' म्हणून साजरा करण्याचे आवाहन ‘युवा सेना'चे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या ९ फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरा होत असतानाच सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याचा त्यांचा आदर्श जोपासण्याचा निर्णय युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्यातर्फे घेण्यात आला आहे.