ऐरोलीत तेली समाजाचे रौप्य महोत्सवी कौटुंबिक स्नेह संमेलन उत्साहात
नवी मुंबई : श्री संताजी प्रगती मंडळ नवी मुंबई या तेली समाजाच्या संस्थेने आयोजित केलेले रौप्य महोत्सवी कौटुंबिक स्नेहसंमेलन अलिकडेच श्रीमती जानकीबाई मढवी मंगल कार्यालय, ऐरोली येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. सदर कार्यक्रमात ज्येष्ठांचे सत्कार, सेवानिवृत्ताचे सत्कार, समाजातील दहावी, बारावी, पदव्युत्तर विद्यार्थांच्या सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्यात आली.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष जनार्दन जगनाडे, चौदावे वंशज यांनी उपस्थित समाज बांधवांना जगनाडे महाराजांचे विचार समाजाचे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे उद्योजक रवींद्र वैरागी तसेच सुभाष पन्हाळे, माजी नगरसेवक अशोक पाटील यांनीही नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विजय मुटे आणि त्र्यंबक बोरस्ते यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मंडळाचे सचिव संजय मुटे यांनी नवी मुंबई शहरात तेली समाजाचे संताजी भवन होण्यास पुढाकार घ्यावा जेणेकरून या शहराच्या संस्कृतीत नक्कीच भर पडेल अशी आशा व्यक्त केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास कार्याध्यक्ष किरण आंब्रे, प्रदीप हिंदळेकर, प्रशांत खोंड, उपाध्यक्ष मुरलीधर सावरकर, जगदीश हिंदळेकर, संदीपान चौधरी, विजय उमाटे, राकेश राऊत, विठल सकपाळ, वसंत राऊत सौ. विद्या गुल्हणे, सौ. श्रद्धा वालेकर, सौ. नम्रता जाधव, अनिल झगडे, अर्जुन बोरस्ते, औदुंबर सराफ, सुभाष मलवे, मिलिंद आंबेकर आदिंनी परिश्रम घेतले.