‘मॅरेथॉन'द्वारे शहीद जवानांच्या कुटुंबाला मदत
कल्याण : सी. एन. पाटील फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रीवरसाईड यांच्या वतीने गांधारी रोड, कल्याण येथे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीसाठी ‘मॅरेथॉन स्पर्धा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास २५०० च्या धावपटुंनी सहभाग घेऊन सहकार्य केले.
मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठि सी. एन. पाटील फाऊंंडेशन, सी. पी. क्लब, कल्याण सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रीवरसाईड या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. ‘सी. एन. पाटील फाऊंडेशन'चे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील आणि ‘रोटरी'चे अध्यक्ष योगेश कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
‘मॅरेथॉन' नंतर शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या नातेवाईकांना ५१ हजार रुपयांचा धनादेश चंद्रशेखर पाटील, प्रिया पाटील, योगेश कल्हापुरे, योगिता कल्हापुरे, जिग्नेश आदि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सदर संस्थांतर्फे आतापर्यंत ११ शहीद जवानांच्या नातेवाईकांना ४ लाख ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण डोंबिवली उपायुक्त संजय जाधव, फोर्टीस हॉस्पिटल, वाहतूक पोलीस अधीकारी, अग्नीशमन दल, कल्याण वकिल संघटना, हर्षल जाधव, सुशील निकम, सुहास भोपी, गणेश चव्हाण, विनोद शेलकर, पोर्णिमा, रेश्मा कांबळे, डॉ. शिवानी तांबोळी, डॉ. कोमल भोईर, डॉ. वर्षा राठोड, मंगल सिंह परदेशी, संजय फुलझेले, उपाध्यक्ष बापू शिंपी, सुधाकर पाटील, ज्योति कोरडे, सिमा पाटील, मिनाक्षी पाटील, मच्छिंद्र जाधव, डॉ. जितेंद्र गुप्ता, विक्रांत महाजन, एन. पी. अय्यर, डॉ. प्रशांत पाटील, अशोक पवार, डॉ. अमित झोपे, स्वाती तांबोळी, जयवंत पाटील, अमोल चौधरी, डॉ. संजय वाघ, अनिता चौधरी, ॲड. तृप्ती पाटील, ॲड. जनार्दन टावरे, ॲड. अविनाश पाटील, किशोर चौधरी, देवीदास पाटील, आदिंनी मेहनत घेतली.