विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका डिजीटल पुस्तिकेचे प्रकाशन
ठाणे : विधानसभा निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे मार्फत ‘विधानसभा र्सावत्रिक निवडणूक-२०२४ पूर्वपीठिका' तयार करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूकविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन डिजीटल पध्दतीने जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सह-पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, सह-पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा-सुव्यवस्था कक्ष नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, पोलीस उपायुक्त मीना मकवाना आणि रश्मी नांदेडकर, निवडणूक खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी दिलीप सूर्यवंशी, कम्युनिकेशन नोडल अधिकारी मेटकरी आणि सुनिल महाले, सहायक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे तसेच अन्य अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांकरिता विधानसभा निवडणूक १९६२ ते २०१९ या कालावधीतील ठाणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच आदर्श आचारसंहिता लागू असताना काय करावे आणि काय करु नये, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, सायबर सुरक्षा, पेड न्यूज, माध्यम प्रमाणीकरण-संनियंत्रण समिती, इत्यादी विषयांबाबतची आवश्यक माहिती या पुस्तिकेद्वारे देण्यात आली आहे.
या पुस्तिकेची निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या पुस्तिकेचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले आहे. या पुस्तिकेसाठी सर्व जिल्हास्तरीय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय नोडल अधिकारी, ठाणे जिल्हा, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघ, ठाणे जिल्हा, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे, अतिरिक्त अभियान संचालक, जल जीवन महाराष्ट्र-स्वच्छता अभियान सुषमा सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी तथा नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको) संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी (सिडको) विजयसिंह देशमख, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी-भूमापन अधिकारी (१२.५टक्के-सिडको) दिपक क्षिरसागर तसेच ठाणे जिल्हा माहिती कार्यालय तथा एकत्रित माध्यम कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहाय्य लाभले आहे.
सदर पुस्तिका https://heyzine.com/flip-book/74fa170c82.html या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी या पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.