नवी मुंबई पोलीस दलातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या  

नवी मुंबई : ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने ‘भारतीय निवडणूक आयोग'ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांनी मुंबई शहर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि वसई विरार या चार पोलीस आयुक्तालयातून बदलीस पात्र असलेल्या एकूण २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबईतील २१ पोलीस निरीक्षकांची मुंबई शहरात तर एका पोलीस निरीक्षकाची अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मुंबई शहरातील २२ पोलीस निरीक्षकांची नवी मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

राज्यातील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ ऑवटोबर रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ‘निवडणूक आयोग'ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशानुसार मुंबई शहर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि वसई विरार या ४ पोलीस आयुक्तालयातून बदलीस पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस दलातून श्रीकांत धरणे, अजय कांबळे, अविनाश काळदाते, तानाजी भगत, प्रमोद तोरडमल, सुधाकर ढाणे, माणिक नलावडे, रमेश जाधव, अनिल पाटील, सुनिल कदम, गिरीधर गोरे, चंद्रकांत लांडगे, अंजूम बागवान, देवेंद्र पोळ, वैशाली गलांडे, संजय नाळे, महेश पाटील, संजय जोशी, संजय चव्हाण, जगदीश शेलकर, सुनिल शिंदे या २१ पोलीस निरीक्षकांची मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे. तर प्रकाश सपकाळ यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.  

तर नवी मुंबईतून बदली होऊन गेल्यामुळे रिक्त झालेल्या नवी मुंबई पोलीस दलात मुंबई शहरातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मनोहर पगार, संजय परदेशी, अभिजित अभंग, सतीश चाबुकस्वार, सागर निकम, पकंज घाडगे, शाम बनसोडे, मोहिनी लोखंडे, शिवाजी भांडवलकर, शरद जाधव, महेश मांडवे, नरेंद्र डंबाळे, सचिन परदेशी, शितल पाटील, संजय लाड, आनंद कांबळे, कल्पना जाधव-बत्तासे, जहागीर मुलाणी, अयाज पटेल, शाकीर पटेल, संदीप वेदपाठक आणि गणेश जाधव या २२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळे गावात आज बहिरीनाथ देवाचे आगमन