एक हजार पोस्ट कार्डवरील पत्रातून दिला मतदान जनजागृतीचा अनमोल संदेश
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू असून निवडणूक विभागाने तसेच शासनाने मतदान वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी आता विद्यार्थ्यांची सुद्धा मदत घेतली जात आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असाच उपक्रम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नवी मुंबई शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना एक हजार पत्रातून मतदान करण्याविषयी आवाहन केले आहे.
दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी घटत आहे मतदानाच्या दिवशी काही लोक सुट्टीचा उपयोग बाहेरगावी फिरण्यासाठी करतात तर काही नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतच नाही त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत आहे.
लोकशाहीच्या या उत्सवांमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे , सहायक आयूक्त श्रीकांत तोडकर, स्वच्छ्ता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे ,सहायक आयूक्त डॉ.अमोल पालवे यावेळी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा विद्यालयाचे प्राचार्य बेल्लम आर टी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपआयूक्त सोमनाथ पोटरे यांनी विद्यार्थ्यांना मतदानविषयी मार्गदर्शनपर संदेश दिला आणि विद्यालयाचे विशेष कौतुक करून आभार मानले.
सदर अनोखा सामाजिक मतदान जनजागृतीचा संदेश भारती विद्यापीठ शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला आहे. कलाशिक्षक नरेश लोहार हे सध्या नवी मुंबईमध्ये मतदान नोंदणी अधिकारी (BLO) म्हणून काम करत आहेत. सदर विद्यार्थ्यांनी पत्रातून असे लिहिले आहे की , बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा मतदाना दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण मतदान जरूर करावे आणि भारताची लोकशाही बळकट करावी ही विनंती, माझेही 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मीही मतदान करेल असे लिहिले आहे, तसेच मतदाना दिवशी लागणारी ओळखपत्रे म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, भारतीय पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाना दिवशी आपण जरूर आणावे असा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना पत्राद्वारे दिलेला आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी मतदार आणि लोकशाही यावर विधानसभा मतदाना संदर्भात लग्नपत्रिका तयार केली आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम तथा बाळासाहेब, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब ,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक एम डी कदम , डॉ. विलासराव कदम, विद्यालयाचे प्राचार्य बेल्लम , उपप्राचार्य आर. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे निवेदन सहशिक्षिका वैशाली कोकाटे यांनी केले. या अनोख्या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक या सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले.