मॅरिएट इंडिया बिझनेस ग्रुपतर्फे नवी मुंबईत रोड टू गिव्ह मॅरेथॉनचे आयोजन
नवी मुंबई : कुष्ठरोगग्रस्तांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सशक्त करुन, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच सामाजिक एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने मॅरिएट इंडिया बिजनेस कौन्सिलच्या वतीने प्रथमच नवी मुंबईत रोड टू गिव्ह मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४५ ते ९.३० वाजता होणा-या या मॅरेथॉनमध्ये नेरुळ येथील मॅरिएट हॉटेल ते तुर्भे एमआयडीसी हे ५ कि.मी.चे अंतर असणार आहे. या मॅरेथॉनमध्ये मॅरिएट इंडिया बिजनेस कौन्सिल ग्रुपचे ५०० पेक्षा अधिक सदस्य सहभागी होणार आहेत.
मॅरिएट इंडिया बिझनेस कौन्सिल ग्रुपतर्फे सेवाभावी कार्यासाठी मागील १० वर्षापासून रोड टू गिव्हचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये धावणे, चालणे, सायकल चालवणे आणि फिरणे या सारख्या क्रिडा प्रकाराचे आयोजन करण्यात येत आहे. आता पर्यंत मॅरिएट इंडिया बिजनेस कौन्सिलने भारत, नेपाळ, भूतान, आणि श्रीलंका येथे सुमारे १० हजार सहयोगी यांच्या सहभागाने धावणे, चालणे, सायकलिंग आणि वेलनेस चॅलेंज यासारखे अनोखे उपक्रम राबवून निधी जमा केली आहे. तसेच त्या निधीतून समाजातील गरजूंना मदत केली आहे.
यावर्षी रायझिंग स्टार आउटरीच ऑफ इंडीया, चेन्नई तामिळनाडू येथील कुष्ठरोगी रुग्णांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सशक्त करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व सामाजिक एकात्म वाढवणे यासाठी देणगी स्वरुपात सुमारे १.२० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.