म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
आगरी समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा
नवी मुंबई : वाशीगांवचे सुपुत्र तथा भाजपा युवानेते निशांत भगत यांनी आगरी-कोळी आणि भंडारी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकारचे स्वतंत्र महामंडळ असावे, अशी मागणी लावून धरली होती. १४ आवटोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगरी समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा केली आहे. त्याबद्दल त्यांचे समाजाच्या आणि भूमिपुत्र यांच्या वतीने निशांत भगत यांनी आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने मागील आठवड्यात राज्यातील विविध अशा ५ समाजांच्या उन्नती साठी महामंडळांची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने देशातील भूमिपुत्रांचे, कष्टकरी शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावे महाराष्ट्र राज्यातील आगरी-कोळी- भंडारी या समाजाच्या उन्नती साठी सहकार्य होईल, असे ‘दि. बा. पाटील आर्थिक विकास महामंडळ' देखील स्थापन करावे या मागणीच्या अनुषंगाने युवानेते निशांत भगत यांनी ११ ऑवटोबर रोजी वाशी येथील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी हातात तशा मागणीचे फलक घेतला होता. याची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात तत्काळ घेऊन जाहिरपणे आश्वासित केले होते. तसेच सदर मागणीचे निवेदन देखील निशांत भगत यांनी आपल्या भूमीपुत्र कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केले होते.
त्याचबरोबर ‘नवी मुंबई पुनर्वसन संस्था'च्या माध्यमातून नेते मंडळींकडे आगरी, कोळी, भंडारी समाजाच्या उन्नतीसाठी प्रथम विचार मांडून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याचे फलित म्हणून महामंडळ निर्मिती करण्याच्या शासनाच्या निर्णयाने झाले असून निशांत भगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. गणेश नाईक साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी जेष्ठ मंत्री जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. राजू पाटील, माजी आमदार संदीप नाईक, नमुंमपा विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांचे समाजाच्या वतीने आभार मानले आहेत. तसेच लवकरच या नवनिर्मित महामंडळाचे ‘लोकनेते दि. बा. पाटील आगरी-कोळी आर्थिक विकास महामंडळ' असे नामकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.