‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद

नवी मुंबई : ‘सिडको'ची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच तब्बल १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. गृहनिर्माणाच्या क्षेत्रात ‘सिडको'वर जनतेचा असलेला अतुट विश्वास सदर योजना द्वारे पुन्हा एकदा सिध्द झाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) या योजनेचे उद्‌घाटन करण्यात आले. सदर योजनाचे संकेतस्थळ https:\\.cidcohomes.com असून नागरिक योजनेस उत्तम प्रतिसाद देत आहेत.

नवी मुंबईच्या विविध नोडस्‌ मध्ये ६७,००० घरांची महायोजना साकारली जात असून, या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील २६,००० घरे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास ‘सिडको'च्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजना मध्ये साकारली जाणारी सर्व घरे संबंधित नोडस्‌ मधील रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि मेट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करुन विकसित केलेल्या या योजना मधील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत आणि सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. या महायोजनेच्या नोंदणीला लाभत असलेल्या भरघोस प्रतिसादावरुन ‘सिडको'ने गृहनिर्माणाच्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानावर जनतेने पुन्हा एकदा केलेले शिक्कामोर्तब केले आहे.

सोडतीची वैशिष्ट्येः

अर्जदारांना सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. सदर योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल. या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. योजनाविषयी सर्वप्रकारची माहिती ‘सिडको'च्या https:\\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदारांना याेजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी ‘सिडको'च्या सदर संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित