विचुंबे येथे गाढी नदीवरील पुलाचे लोकार्पण

पनवेल : तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण ‘भाजपा'चे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. गेले अनेक वर्ष विचुंबे येथे नवीन पुल उभारावा, अशी मागणी होत होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. ना. रवींद्र चव्हाण यांनी या कामाला मान्यता देत सदर पुल पूर्णत्वास नेला. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल नागरिकांनी ना. रवींद्र चव्हाण आणि आ. प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

देशात मोदी सरकार आणि राज्यात ‘महायुती'चे सरकार विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे. तर दुसरीकडे कोट्यवधींचा भ्रष्टाचार करुन माजी आमदार विवेक पाटील गेली ३ वर्ष जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचार करुन लोकांना देशोधडीला लावणाऱ्या विवेक पाटील यांचा फोटो ‘शेकाप'च्या बॅनरवर लावायला लागतो, असे आ. प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी ८.५० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्‌घाटन, तर विचुंबे गावात अंतर्गत गल्लीचे-रस्त्याचे काँक्रीटीकरण, विचुंबे बौध्दवाडा ते ग्रीन व्हॅली पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण आणि विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुध्दविहार ओमकार पार्क पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमीपुजन झाले.

या सोहळ्यांना ‘भाजपा'च्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, ‘अनुसूचित जाती सेल'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, उसर्लीचे उपसरपंच नितीन भगत, अध्यक्ष के. सी. पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, बळीराम पाटील, रवींद्र भोईर, अविनाश गायकवाड, जगदीश भोईर, डी. के. भोईर, संजित भिंगारकर, तुकाराम भोर्ईर, विवेक भोईर, सदस्य मुकेश भगत, अमित भोर्ईर, भरत पाटील, अप्पा गायकवाड, विभूती सरते, आरती गायकवाड, श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अमित म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, जयश्री म्हात्रे, ज्योती भोईर, स्वाती सुरते, रंजना सुरते, हर्षदा भिंगारकर, बबिता भोईर, सोनम म्हात्रे, निलम भिंगारकर, नविता भोईर, विशाखा सुरते, अक्षता गायकवाड, भावना भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टेक्नॉलॉजी क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल-उपमुख्यमंत्री फडणवीस