तनिष पाटील याचे ‘नासा'च्या परीक्षेत सुयश
ठाणे : जिल्हा परिषद शाळा, दिवे अंजूर शाळेचा विद्यार्थी मधील तनिष संदीप पाटील याने ‘नासा'तर्फे घेण्यात आलेल्या चंद्र निरीक्षण स्पर्धा मध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे.
जागतिक पातळीवरील सदर परीक्षेत जवळपास ७ लाख विद्यार्थी बसले होते. स्पर्धेच्या अंतिम १० व्या राऊंडपर्यंत तनिष टिकून राहिला. विशेष म्हणजे तनिष याने इंग्रजी भाषेतून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून देखील तनिष पाटील आत्मविश्वासाने या स्पर्धेत टिकून राहिला.
अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी होणे नक्कीच खूप मोठे कार्य आहे. तनिषच्या या यशामुळे शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल झाले आहे. या यशाबद्दल तनिश पाटील याचे शाळेतील मुख्याध्यापक पांडुरंग भोईर, शिक्षक आणि गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.