वायु प्रदूषणाच्या विळख्यात ‘नवी मुंबई'

वाशी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिका नवी मुंबई शहराला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत स्वच्छता ठेवत आहे. मात्र, याच नवी मुंबई शहरात रात्री वायू प्रदूषण होत असल्याने स्वच्छ नवी मुंबई शहरात स्वच्छ हवा मिळणे दुरापस्त झाले आहे.त्यामुळे नवी मुंबई शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा कधी सुटणार?, असा प्रश्न नवी मुंबई शहरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे नवी मुंबई शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे नवी मुंबई शहरात औद्योगिक कंपन्यांद्वारे रात्री रासायनिक मिश्चित वायू सोडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे.  रात्री १० ते ११ नंतर नवी मुंबई एमआयडीसी मधील कंपन्या हवेत दूषित वायू सोडत असून, त्याचा त्रास नवी मुंबई शहरातील रहिवाशांना  सहन करावा लागत आहे. स्वच्छतेमध्ये नवी मुंबई शहर गरुड झेप घेत आहे. मात्र, नवी मुंबईकरांची प्रदूषणाच्या विळख्यातून कधी सुटका होणार?, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

औद्योगिक वसाहतीतील रबाळे , पावणे येथील कंपन्या  मोठ्या प्रमाणावर हवेत रासायनिक मिश्चित वायू सोडतात. उग्र वासाने श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहे. दर्प वासामुळे उलटी, मळमळ सारख्या त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वाशी, बोनकोडे ,कोपरी गाव, कोपरखैरणे, घणसोली विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत. त्यामुळे या विभागात  वायुप्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे.त्यामुळे नवी मुंबई शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा कधी सुटणार?, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा गुणवत्ता निर्देशांक मोजमाप चुकीचे दाखवून पर्यावरणासोबत खेळ खेळला जात आहे.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी लोकांना फसवून हवा स्वच्छ  असल्याचे भासवतात. परंतु, रात्री होत असलेल्या वायू प्रदुषणाकडे  दुर्लक्ष करुन प्रत्यक्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी लोकांचे आरोग्य  धोक्यात टाकत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे. - प्रो. विनील कुमार सिंग, स्थानिक रहिवासी - सेक्टर- २६, वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होणे गरजेचे