आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा होणार...

नवी मुंबई : नवी मुंबईतील सुमारे 300 वर्षा पूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून किल्ले गांवठाण येथील आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिध्द आहे. तसेच नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेसे आणि चिमाजी अप्पांपासून 300 हुन अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देणारे आई गोवर्धनी माता मंदिर आहे.

तसेच नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे. आई गोवर्धनी माता मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराच्या जीर्णोध्दार 17 वर्षापूर्वी उद्योजक विजय नारायण म्हात्रे आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. आई गोवर्धनी माता मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव घटस्थापना होणार आहे. 

आई गोवर्धनी माता मंदिरात ३ आक्टोबर २०२४ पासून नवरात्रोत्सवाचे प्रारंभ होत असून सकाळी ६ च्या दरम्यान मातेच्या शिल्प प्रतिमेवर अभिषेक करण्यात येणार असून सकाळी ८ वाजता देवीची घटस्थापना व त्यानंतर देवीची आरती होणार आहे. नवरात्रौत्सव काळात दररोज सकाळी ७.३० वाजता आईची पुजा-आर्चा होणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता 'हळदी कुंकू'  कार्यक्रम होणार आहे. तसेच १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत आईचा 'नवचंडी होम' आणि दुपारी १ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती आमदार सौ, मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

या नवरात्रोत्सव शुभदिनी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे आमंत्रण आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ऑक्टोबर रोजी कासारवडवली येथे दौरा