सिडको ट्रान्स्फर चार्जेस रद्द करावे
नवी मुंबई :- शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येतील वर्षावर भेट घेत सिडको घेत असलेले ट्रान्सफर चार्जेस तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
यावेळी विजय नाहटा यांनी फ्लॅट हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी सिडको वसूल करत असलेले चार्जेस कसे बेकायदेशीर व जाचक आहेत, यामुळे सदनिका धारकांना मारावे लागणारे हेलपाटे,होणारा मानसिक त्रास व नाहक करावा लागणारा खर्च तसेच याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देत निवेदन दिले .
मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. नवी मुंबईतील जनतेच्या हिताचा निर्णय त्वरित घेण्याच्या सूचना आणि आदेश आ. संजय शिरसाठ यांना दिल्या.
यावेळी विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी, हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर मात्रे, सुनील चौधरी, सतीश निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने उपस्थित होते.
दरम्यान, सिडको घेत असलेले ट्रान्सफर चार्जेस रद्द होणे बाबत विजय नाहटा करीत असलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना यश येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल शिष्टमंडळाने दोघांचे आभार मानले.