दिवाळे गाव शाळेचा लवकरच कायापालट

नवी मुंबई : नवी मुंबई शहर झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून आणि आमदार निधीमधून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली हत आहे. नवी मुंबई शहर सर्व सुविधायुक्त म्हणून नावारुपास आहे. परंतु, याच नवी मुंबईमधील दिवाळे गावातील ग्रामस्थांची शाळा गेल्या ७० वर्षाहून अधिक जुनी पूर्वीची असून ती मोडकळीस अवस्थेत आहे. या शाळेच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पालकांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांना भेटून त्यांच्यासमोर सदर समस्या कथन केल्या.

त्यामुळे लागलीच आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गांव शाळेला भेट देऊन शाळेच्या दुरावस्थेबाबत नवी मुंबई महापालिकेचे  तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या सोबत चर्चा केली. यानंतर आयुवत नार्वेकर यांनी सर्व सुविधायुक्त शाळा बांधण्याची कार्यवाही करण्यासाठी अभियंता विभागाला निर्देश दिले होते. अखेर महत्प्रयासानंतर दिवाळे गांव शाळेची दोन मजल्याची इमारत बांधण्यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. सदर शाळा उभारणीसंदर्भातील निविदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी महापालिकेने प्रसिध्द केली असून त्याअनुषंगाने प्रक्रिया करुन लवकरच दिवाळे ग्रामस्थांच्या शाळेचे भूमीपुजन करण्यात येईल, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

प्राथमिक शाळा एक अशी व्यवस्था आहे, जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंड ओळख होते. तसेच मुले घरापासून दूर स्वतंत्र रहायला शिकतात. प्रत्येक व्यक्तीसाठी आवडीचे शिक्षण असते. आजच्या काळात गांवठाण विभागात प्राथमिक शाळेची फार दयनीय अवस्था असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांकडे प्राधान्याने लक्ष देणे लोकप्रतिनिधीचे प्रथम कर्तव्य आहेे. जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्व आहे. आजचेे युग स्पर्धेचे आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे. या शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करु शकतो. प्राथमिक शिक्षण तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण प्रत्येक मुलांना मिळालेच पाहिजे या दृष्टीकोनातून दिवाळे गावातील शाळेचे पुनर्विकास करून मुलांना चागंल्या दर्जाचे शिक्षण तसेच राहणीमान उंचावण्याकरिता उत्तम दर्जाची शाळा असणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने १० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने आता दिवाळे येथे सर्व सुविधायुवत शाळा पहावयास मिळणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळ्यातील साथरोग, किटकजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घ्या