ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबईतील 22 सामाजिक संस्थांनी केला वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध
नवी मुंबई : देशात व महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत अल्याने नवी मुंबईतील 22 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन बुधवारी दुपारी 4 वाजता वाशी रेल्वे स्टेशन समोर काळ्या फिती लावून तसेच सह्यांची मोहीम राबवून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सर्व शाळा महाविद्यालयातून सखी सावित्री समिती गठीत झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संस्थांची भूमिका सांगणारी पत्रके वाटून परिसरातील लोकांशी या प्रश्नावर संवाद देखील साधला.
यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी आपली भूमिका मांडताना स्त्रियांना बाई म्हणून नाहीतर माणूस म्हणून वागवले पाहिजे. बदलापूर, नवी मुंबई, कलकत्ता व इतरत्र घडणाऱया अमानुष व विकृत लैंगिक हिंसाचाराच्या घटनांना आळा बसला पाहिजे, या अत्याचाराच्या घटना घडत असताना सामान्य माणसाने बघ्याची भूमिका न घेता व्यक्त झाले पाहिजे, लैंगिक हिंसाचाराच्या घटनेवर सामान्य माणूस संवेदनशील राहिला, या विषयावर जागृत झाला तर या घटनांना आळा बसायला नक्कीच मदत होईल असे स्पष्ट केले. तसेच सर्व शाळा महाविद्यालयातून सखी सावित्री समिती गठीत झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी मागणी केली.
यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या समुपदेशक रश्मी कारले यांनी शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी सत्रे, समुपदेशन, सह्यांची मोहीम, लोकांची संवाद असा पुढील कृती कार्यक्रम आखण्यात आल्याचे सांगितले, यावेळी अन्वय प्रतिष्ठानचे अजित मगदूम, अलर्ट इंडियाच्या प्रभा महेश, लायन्स क्लबच्या स्मिता वाजेकर, एनजीओ फोरमच्या अमरजा चव्हाण, स्त्राr मुक्ती संघटनेच्या विश्वस्त संगीता सराफ, परिसर सखीच्या रुक्मिणी पॉल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक निकम व इतर कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. 22 संस्थेमधील सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी जागर जागवत संकल्प करत समाजात एक ठोस विचार रुजवला. प्रबोधनपर गीते, घोषणा, भाषणे या माध्यमातून सुमारे अडीच तास हे निषेध आंदोलन पार पडले.