गणपतीच्या मुहूर्तावर सिडकोची मेट्रो दर कपात  

7 सप्टेंबरपासून मेट्रोचे नवीन तिकीट दर लागू   

तिकीट दर किमान 10 तर कमाल 30 रुपये  

नवी मुंबई : जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱया नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून मेट्रोचे सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर 10 रुपये तर कमाल 30 रुपये असणार आहे.  

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र.1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवा सुरु झाली असून या मेट्रोला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  

नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, तसेच नवी मुंबई मेट्रोकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33 टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात केली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱया प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. 

विजय सिंघल (व्यवस्थापकीय संचालक  सिडको)   

नवी मुंबई मेट्रोच्या सुधारित दरांनुसार पहिल्या 2 कि.मी. आणि 2 ते 4 कि.मी. करिता 10 रुपये तसेच पुढील 4 ते 6 कि.मी. आणि 6 ते 8 कि.मी. करिता 20 रुपये तर 8 ते 10 कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता 30 रुपये तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर 40 रुपये इतका होता. हा तिकीट दर आता 30 असणार आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गणेशोत्सव'साठी नवी मुंबई पोलीस सज्ज