‘घर हक्क संघर्ष समिती'चा पनवेल महापालिकेवर मोर्चा
पनवेल : घर हक्क संघर्ष समिती आयोजित पनवेल शहर निर्माण अभियान अंतर्गत पनवेल विकास आराखडा-२०२४ ते २०४४ या विकास आराखड्यावर सूचना-हरकतीसाठी ३० दिवसाची वाढीव मुदत मिळावी यासाठी ‘घर हक्क संघर्ष समिती'च्या वतीने पनवेल महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पनवेल मधील झोपडपट्टीवासिय, आदिवासी पाडा, कातकरी पाडा, पनवेल शहरातील गांवठाणे, पाड्यातील रहिवाशी तसेच ‘घर हवक संघर्ष समिती'चे कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाला ‘घर हवक संघर्ष समिती'चे संस्थापक-अध्यक्ष हिरामण पगार, उपाध्यक्ष खाजाँमिया पटेल, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, काँ. भारती भोईर (आयटक), ‘घर हवक संघर्ष समिती'च्या महिला अध्यक्षा सौ. विनीता बाळेकुंद्री, मुख्य सल्लागार अँड. सुजीत निकाळजे, खजिनदार कैलाश सरकटे , सचिव राजू वंजार, ‘शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे मार्गदर्शन केले. पनवेल मधील सन २०११चीच जनगणना ग्राह्य धरुना विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये बऱ्यापैकी सोयी-सुविधांचा अभाव आहे. यामध्ये सुधारणा करुन वाढीव मुदत मिळावी, अशी मागणी यावेळी मान्यवरांनी बोलताना केली.
मोर्चावेळी ‘संघर्ष समिती'च्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिका उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर ‘घर हवक संघर्ष समिती'ची मागणी नक्कीच शासन दरबारी मांडून यासंबंधी लवकरच एक बैठक लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यावर जोपर्यंत विकास आराखडयाची मुदत वाढून मिळणार नाही, तोपर्यंत ‘घर हक्क संघर्ष समिती'चा लढा चालूच राहील, असे अध्यक्ष हिरामण पगार यांनी सांगितले.
दरम्यान, मोर्चा यशस्वी करण्यासाठी अजय बोरकर, विद्याताई, मंगेश कांबळे, जयसिंग रणदिवे, सुकन्या जाधव, शांताताई खोत, सचिन खरात यांनी विशेष मेहनत घेतली. अशोक जमादार, ज्ञानेश्वर जाधव, भैय्यासाहेब आठवले, पुनीत वर्मा, कलावती माळी, मियासा शेख, चांद सैय्यद, तानाजी कांबळे, उल्हास नेरुरकर, प्रकाश वानखेडे, कोंडीबा हिंगोले, सौ. सुनंदा बाविस्कर, सौ. सिमा काळुंखे, लक्ष्मी लोहार तसेच इतर महिला आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.