ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
नवी मुंबई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून संदिप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील शिक्षकांचा प्रातिनिधिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते शिक्षकांना शाल प्रमाणपत्र आणि चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
नेरूळ येथील तेरणा कॉलेजच्या सभागृहात या सन्मान सोहळ्याला शिक्षकांची भरगच्च उपस्थिती लाभली. माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, नेत्रा शिर्के, डॉ. जयाजी नाथ, सुरज पाटील, अशोक गुरखे, नांदुगडे, मनोहर सुळे, मुकेश पष्टे, प्राचार्य प्रताप महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना संदीप नाईक यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाची शिदोरी आयुष्यभर पुरते. शिक्षकांचे सामाजिक चळवळीतील योगदान मोठे आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला त्याचप्रमाणे शिक्षकांच्या डोक्यावरील शाळाबाह्य कामांचे ओझे कमी झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सुरक्षित आणि प्रगतिशील नवी मुंबईचे उत्तरदायित्व येथील जनतेने आमच्यावर सोपवले असून ते निश्चितच पार पाडत राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करण्यात आले.
मनोज महाजन यांचा सन्मान...
शिक्षक सन्मान सोहळा सुरू असतानाच आयएएस हायस्कूल नवी मुंबईचे शिक्षक मनोज महाजन यांना शासनाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याची आनंदाची बातमी आली. यानिमित्त संदीप नाईक यांच्या शुभहस्ते महाजन यांचा अभिनंदनपर सन्मान करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक.....
• हनुमंत जाणकर, नवी मुंबई महापालिका शिवाजी नगर, नेरुळ.
• नुतन संजय गवांदे, पुणे विद्याभवन, नेरुळ
• सुकन्या खंडु लांडगे, एस. एस. पी. मंडळ, तुर्भे
• विजय परशुराम बेबले, नवी मुंबई महापालिका शाळा क. १११, तुर्भे
• ज्योत्स्ना भा. भोईर, विद्या उत्कर्ष मंडळ बेलापूर
• सुमन बंडगर, नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ११२, करावे
• पद्मिनी भरत तांबे, नवी मुंबई महापालिका शाळा क. २०, वाशी
• रवी कोंडख्या पिनेका, स्वामी विवेकानंद, कोपरी
निवृत्त माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार
• इंद्रप्रकाश पाल, नवी मुंबई महापालिका शाळा
• मंदाकिनी सुनिल कासारे, भारती विद्यापिठ प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज, बेलापूर
• सुलभा राजीब बालघरे, मनपा शाळा क्र. ०१, दिवाळे.