‘नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी-संवर्ग संघर्ष समिती'तर्फे लाक्षणिक उपोषण

उरण : ‘महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग संघर्ष समिती'च्या वतीने कोकण विभागीय आयुक्त कार्यालय आणि नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

नगरपरिषद-नगरपंचायत मधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे ज्यापैकी मुख्य मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव, वित्त विभाग सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमधील निर्णयांची अंमलबजावणी १ वर्षे आणि ३ महिने होऊनही झालेली नाही. याकडे संबंधितांचे प्रामुख्याने लक्ष वेधण्याकरिता कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयावर व नगरपालिका प्रशासनालय कार्यालय येथे ‘नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी-संवर्ग संघर्ष समिती'चे निमंत्रक तथा ‘म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष अँड. सुरेश ठाकूर, ‘संघर्ष समिती'चे नेते तथा ‘म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन'चे कार्याध्यक्ष संतोष पवार, ‘युनियन'चे सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यानंतरच झालेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. तसेच येत्या २० जुलै २०२४ रोजी पनवेल महापालिकेतील कामगारांसह कोकण विभागीय भव्य मेळावा पनवेल येथे घेण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन नगरपालिका प्रशासन संचालनालयचे संचालक मनोज रानडे यांच्याकडे देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या आंदोलनाप्रसंगी कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, राकेश पाटील,  भूषण काबाडी, अजिंक्य हुलवणे, शैलश गायकवाड, अंनत पाटील, दत्तगुरु म्हात्रे, रविंद्र आयनोडकर, संतोष कुडेकर, नरेद्र नांदगांवकर, मनोज पुलेकर, आलिम मुल्ला, चव्हाण, सचिन रसाळकर, राहुल गायकवाड, हरेश जाधव, मधुकर भोईर, रमेश कांबळे, सितारामदादा म्हसकर, संगीता सोलंकी, दत्तात्रय डोहले, माधव सिद्धेश्वरे, राजेश सोलंकी, जितेंद्र पाडावे या प्रमख पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह कोकण विभागातील नगरपरिषद-नगरपंचायत कामगार नेते, प्रतिनिधी, आदि मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी मसाला बाजारात समस्याच-समस्या