म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण, अल्प कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने यंत्रणांनी काम करावे -सौरभ राव
ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करुन आपले क्षेत्र खड्डेमुक्त करुया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा विशेषतः घोडबंदर रोडचा आढावा घ्ोण्यासाठी १० जुलै रोजी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, ‘मेट्रो'चे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, अतुल पाटील, आदि अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सदर बैठकीत घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनिःस्सारण वाहिनीचे काम, नागला बंदर परिसरातील ‘मेट्रो'च्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंदनगर चेक नाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजना याबद्दल चर्चा करण्यात आली.
पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करुन रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे, हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. आनंदनगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत? तसेच त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरु आहे? उड्डाणपुलांची जबाबदारी कोणाची आहे? या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.