सिडको तर्फे नवी मुंबई मधील ४८ भूखंडांची विक्री

वाशी : सिडको महामंडळ तर्फे नवी मुंबई मधील घणसोली, नेरुळ, सीबीडी-बेलापूर, कोपरखैरणे, खारघर, कळंबोली, पनवेल (पूर्व), पनवेल (पश्चिम) आणि पुष्पक नगर नोड या परिसरातील एकूण ४८ भूखंड निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरिता भाडेपट्ट्यावर उपलब्ध करुन  देण्यात येणार आहेत.

भूखंड विक्रीकरिता सिडको मार्फत  ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचा बंगला, रो-हाउस, हॉटेल तसेच वाणिज्यिक संकुल बांधू इच्छिणाऱ्या नागरिक आणि विकासक, बांधकाम व्यावसायिक यांच्याकरिता सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सदर भूखंड विक्री निविदा प्रकियेला ८ जुलै २०२४ पासून सुरुवात झाली असून, २३ जुलै २०२४ पर्यंत निविदा भरता येणार आहेत.

योजनेची  वैशिष्ट्ये

- योजना क्रमांक-३९ अंतर्गत निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरीता भूखंड उपलब्ध करण्यात आले आहेत.
- नवी मुंबई मधील घणसोली, नेरुळ, सीबीडी-बेलापूर, कोपरखैरणे, खारघर, कळंबोली, पनवेल (पूर्व), पनवेल (पश्चिम) आणि पुष्पक नगर नोड मध्ये मोक्याच्या ठिकाणी भूखंड उपलब्ध.
- भूखंडाचे कमाल क्षेत्रफळ १४४३४.७६ चौ.मी. आणि किमान क्षेत्रफळ ६०.०८ चौ.मी. असणार आहे.

वेळापत्रक

- बंद निविदेकरिता दस्तऐवज शुल्क भरण्याची प्रक्रिया ८ जुलै पासून २०२४ पासून सुरु झाली असून, २३ जुलै २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत निविदा भरण्याची संधी.
- बंद निविदेकरिता अनामत रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
- बंद निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
- ई-लिलावाकरिता दस्तऐवज शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२४ रोजी १२.०० वाजेपर्यंत.
- ई-लिलावाकरिता अनामत रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२४ रोजी १२.०० वाजेपर्यंत.
- ऑनलाइन ई-लिलाव २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २४ जुलै २०२४ रोजी १८ वाजेपर्यंत.
- निकाल २५ जुलै २०२४ रोजी १५.०० वाजता घोषित. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण, अल्प कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने यंत्रणांनी काम करावे -सौरभ राव