म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
कहाणी एका ऐतिहासिक उडीची
मारिया बोटीतून उडी मारण्याआधी सावरकरांनी जानव्याच्या दोरानी पोर्ट होलचा व्यास मोजला होता. सावरकरांची छाती होती ३२ इंच आणि पोर्टहोलचा व्यास होता १९ इंच. सावरकरांचं हे साहस अनेक अर्थानं धाडसाचं आणि अद्वितीय होतं. कारण काच फोडलेल्या त्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी मारताना अंग अणि बरगड्या यांना प्रचंड जखमा झाल्या. समुद्राचं खारट पाणी जखमांना लागल्यावर झालेली आग, अशा अवस्थेत तीनशे तेचारशे मीटर समुद्रातून पोहत किनाऱ्यावर जायचं होतं. अर्थात हे पोहणंही सोपं नव्हतं.
पलायन हे नेहेमीच यशस्वी होतं असं नाही. रशियन जुलूमाला कंटाळून अनेक युरोपियन कैद्यांनी तुरुंगातून पलायन केलं होतं. पहिल्या महायुद्धानंतर हिटलरच्या जुलूमाला त्रासून ऑशविग छळ छावण्यांमधून स्वतःची सुटका करून घेत पलायन केलेल्या ज्यूंच्या अनेक कहाण्या आहेत. पण अयशस्वी पलायनंही अनेक वेळा प्रेरणा देऊन जातात. असंच एक पलायन गाजलं ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर; ८ जुलै १९१० ह्या दिवशी. मोरीया बोट मार्सेलीस बंदराजवळ आली असताना एका कैद्यानं तिच्यावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पलायन केलंही; पण थोड्याच वेळात फ्रान्स पोलिसांच्या लालचीपणामुळे ते फसलं. तो कैदी होता वीर सावरकर.
मुळात सावरकर त्या बोटीवर चाढलेच का होते हे आधी समजावून घेतलं पाहिजे. फर्ग्युसनला शिकत असताना सावरकर लोकमान्यांच्या संपर्कात आले. त्याला कारण ठरली ती विदेशी कपड्यांची होळी. ही कल्पना खरतर सावरकरांचीच. लोकमान्यांनी मंडालेहून सुटून आल्यावर चतुःसूत्री देशासमोर ठेवली. त्यातलं एक सूत्र होतं स्वदेशीचा वापर. जर स्वदेशी वस्तु वापरायच्या असतील तर विदेशी वस्तु घरात ठेवायच्याच कशाला, ही कल्पना सावरकरांची. त्यावेळी आपलाच कापूस इंग्लंडला नेऊन मँचेस्टरच्या कापड मिलमध्ये केलेले तयार आणि स्वस्त कपडे हिंदुस्थानात आणून विकण्याचा उद्योग इंग्रज करत असल्यानं हिंदुस्थानातील कापड उद्योग, हातमाग यांच्यावर मोठा परिणाम होऊन ते बंद पडत होते. त्यामुळे त्यांना उर्जितावस्था आणण्यासाठी स्वदेशी कपड्यांचा स्वीकार करायचा ही कल्पना लोकमान्यांची आणि त्यासाठी विदेशी कपड्यांची होळी करायची असं सावरकरांनी कॉलेज शिक्षण घेत असताना ठरवलं आणि पुण्यात पहिली विदेशी कपड्यांची होळी पेटली. पुढे लोकमान्यांच्याच शिफारसीवरून सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले आणि तिथे छुप्या मार्गानं क्रांतीकार्य सुरू केलं.
एकीकडे ते मॅझिनीचं चरित्र लिहीत होते. इटलीच्या एकात्मतेचं स्वप्न पाहून त्यादृष्टीनं प्रयत्न करणारा, कार्बोनेरी ही संघटना निर्माण करून त्या माध्यमातून देशकार्य करणारा जोसेफ मॅझिनी! त्याचं उदाहरण, प्रेरणा भारतीयांनी घ्यावी ह्यासाठी ते चरित्र लिहिण्याचं काम सावरकर करत होते. इकडे हिंदुस्थानात जॅक्सनचा वध कान्हेरेंनी केला होता. ते पिस्तूल सावरकरांनी इंग्लंडहून भारतात पाठवलं होतं असा संशय ब्रिटीशांचा होताच. त्यामुळे सावरकरांवर अटक वॉरंट काढण्यात आलं. वॉरंट निघालं त्या वेळी सावरकर पॅरिसला गेले होते तिथे त्यांना ह्या वॉरंटची बातमी समजली आणि ते परत इंग्लंडला आले. अर्थात किनाऱ्यावरच त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. देशविघातक कारवाया करणे, समाजात इंग्रजांबद्दल अपप्रचार करणे, समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आणि तो खटला हिंदुस्थानात चालावा ह्या उद्देशानं सावरकरांना हिंदुस्थानात नेण्याचं ठरलं.आणि तिथून सुरू झाली ती एका साहसाची कहाणी. १ जुलैला सावरकरांना घेऊन जाणाऱ्या मोरीया बोटीनं लंडनचा किनारा सोडला त्याच्या आधीच तुरुंगात भेटायला आलेल्या व्ही व्ही एस अय्यर ह्या त्यांच्या एका सहकाऱ्याला सावरकर म्हणाले होते की आता पुढची भेट मार्सेयच्या किनाऱ्यावर. (त्या बंदराच्या इंग्लिश उच्चार मार्सेलीस असा असला तरी फ्रेंच उच्चार मार्सेय असा आहे.)
मधल्या आठवड्याभराच्या काळात सावरकरांनी मोरीया बोटीचं व्यवस्थित निरीक्षण केलं होतं. त्यामुळे कुठून आणि कशी सुटका करून घ्यायची याची पद्धतशीर आखणी झाली होती. सावरकरांनी जानव्याच्या दोरानी पोर्ट होलचा व्यास मोजला होता. सावरकरांची छाती होती ३२ इंच आणि पोर्टहोलचा व्यास होता १९ इंच. सावरकरांचं हे साहस अनेक अर्थानं धाडसाचं आणि अद्वितीय होतं. कारण काच फोडलेल्या त्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी मारताना अंग अणि बरगड्या यांना प्रचंड जखमा झाल्या. समुद्राचं खारट पाणी जखमांना लागल्यावर झालेली आग, अशा अवस्थेत तीनशे तेचारशे मीटर समुद्रातून पोहत किनाऱ्यावर जायचं होतं. अर्थात हे पोहणंही सोपं नव्हतं. कैदी पळाला, हे मोरीया बोटीवर समजल्यावर छोट्या होडीतून ब्रिटिश पोलिसांनी पाठलाग करायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे असलेल्या बंदुकांमधून गोळ्या मारायला सुरुवात केली होती. त्यामुळे सावरकरांना बरचसं अंतर हे पाण्याखालून पोहावं लागत होतं. आधीच जखमांनी भरलेलं अंग आणि त्यात समुद्राच्या खालून खारट पाण्यातून पोहणे. त्यामुळेच ती उडी ऐतिहासिक ठरली.
आणखी एका करणानं ही उडी विशेष ठरते. समुद्रात उडी मारताना माणूस जितक्या वरुन उडी मारतो तितक्या खोल जातो. मोरीया बोटीचं पोर्टहोल २२ फुटांवर होतं. त्यामुळे सावरकरांनी उडी मारल्यावर तितक्या खोल जाण्याची भीती होती. अपरिचित समुद्र असल्यामुळे समुद्रात खाली प्रवाळ असतं तर आणखी जखमा होण्याची शक्यता होती, खालीवाळू असती तर त्यात रुतण्याची शक्यता होती, खडक असते तर आपटून जीवाचा धोका होता.ह्या सगळ्या शक्यता आणि धोके असूनही सावरकरांनी ते धाडस केलं आणि म्हणून ती उडीऐतिहासिक ठरते.सावरकरांनी मार्सेयचाच किनारा ह्या उडीसाठी निवडला त्याचंही एक कारण होतं.युरोपच्या त्यावेळच्या राजकारणात फ्रान्स आणि इंग्लंड हे राजकीय प्रतिस्पर्धी होते. त्यामुळेअर्थातच गुन्हेगार हस्तांतरण कायदा त्या देशांदरम्यान नव्हता. त्याचा अर्थच हा होता कीसावरकरांना ब्रिटिश पोलिस फ्रान्सच्या भूमीवर पकडू शकत नव्हते आणि फ्रेंच पोलिसांनी पकडलं असतं तरी त्यांना ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रश्नच नव्हता. आणि नेमकं तेच झालं. त्याचे पडसाद मात्र फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर उठले. ब्रिटिश पोलिस फ्रेंच पोलिसांकडून कैदी ताब्यात घेतात ह्याचा अर्थ त्यांचा दबाव फ्रेंच पोलिसांवर आहे, असा अर्थ होता. काहीही कारण नसताना फ्रेंच पोलिसांनी ब्रिटिश पोलिसांच्या दबावाला बळी पडणे ही घटना फ्रेंच जनतेच्या राष्ट्रभावना दुखावणारी होती आणि त्यामुळे फ्रान्समध्ये जनमत प्रचंड उसळलं.
देशभरात एक आंदोलन उभं राहिलं, मोठ्या प्रमाणावर देशभरात निदर्शनं झाली. ज्या दोन पोलिसांनी पैसे घेऊन सावरकरांना ब्रिटीशांच्या ताब्यात दिलं त्यांना तडकाफडकी नोकरीतून काढून टाकण्यात आलं. इतकंच नाही, फ्रेंच राष्ट्राप्रमुखांना ह्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. अर्थात त्या उडीचे राजकीय पडसादही मोठ्या प्रमाणावर पडले. जगातील ११४ देशातील वृत्तपत्रांनी त्या उडीची दखल घेत त्याची वृत्ते पेपरमधून छापली आणि ती उडी जगभरात गेली. त्याकाळी इंग्रजांचं राज्य जगातील अनेक देशांवर होतं. त्यापैकी अनेक देश स्वातंत्र्यासाठी धडपडत होते. त्या देशातल्या क्रांतिकारकांनी ह्या उडीतून मोठी प्रेरणा घेतली. सावरकर त्यांच्यासाठी आदर्श ठरले होते. - अमित पंडित