पर्यावरणपुरक उत्सव साजरे करण्याचे आवाहन

उल्हासनगर : पर्यावरणपुरक उत्सव साजरे करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १७ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील घरगुती गणपती पर्यावरणपुरक असतील, याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिवत आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त (पर्यावरण) डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका स्थायी समिती सभागृहामध्ये ८ जुल रोजी उल्हासनगर शहरातील मूर्ती कारखानदार, मुतीकार, मुर्ती विक्रेते यांची बैठक बोलाविण्यात आली होती.

‘केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडील मुर्ती विसर्जनाशी संबंधित सुधारित मार्गदर्शक तत्वे १२ मे २०२० रोजी प्रसारित करण्यात आली असून त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन तयार करण्यात येणाऱ्या मुर्त्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील मुर्ती कारखानदार तसेच विक्रेते यांनो प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्या तयार करु नयेत. तसेच त्यांचा साठा, आयात आणि विक्रीवर बंदी असल्याने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुत्यांची विक्री होत असल्याची बाब आढळून आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई होणार असल्याची बाब आयुवत अजीज शेख यांनी बैठकीमध्ये उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिलीे.

सदर बैठकीस उल्हासनगर शहरातील मुर्ती कारखानदार, विक्रेते यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुवत तथा प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, दत्तात्रय जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, जनसंपर्क अधिकारी, विशाखा सावंत, पर्यावरण विभाग प्रमुख तसेच इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्या घरगुती उत्सवात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे होणारे जलप्रदुषण रोखण्यासाठी तसेच जगभरात निसर्गाच्या विविध घटकांमध्ये होणारे प्रदुषण यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शहरातील मुर्तीकार, कारखानदार, विक्रेते यांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरिता शहरातील मुर्तीकार, कारखानदार, विक्रेते यांनी नागरिकांना शाडू मातीच्या मुर्त्या उपलब्ध करून द्याव्यात. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात यावी.

-अजीज शेख, आयुवत-उल्हासनगर महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडको तर्फे नवी मुंबई मधील ४८ भूखंडांची विक्री