म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
रेल्वे सेवा ठप्प ; प्रवाशांचे हाल
वाशी : ७ जुलै रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते.याचा परिणाम रेल्वे सेवावर ८ जुलै रोजी सकाळपासूनच रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.त्यामुळे प्रवाशांनी रस्ते वाहतुकीकडे मोर्चा वळवला. मात्र, रस्त्यावर देखील मोठी वाहतुक कोंडी असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
७ जुलै रोजी रात्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरासह उपनगराला पावसाने झोडपले. रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील नागरिकंाची चांगलीच दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल फक्त ठाणे पर्यंत धावत होत्या. रेल्वे रुळांवर बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा फक्त ठाणे पर्यंत सरुरू ठेवण्यात आली होती. दुसरीकडे ८ जुलै रोजी हार्बर लाईन वरील वाहतुक देखील ठप्प होती. रेल्वे सेवा ठप्प असल्याने प्रवाशांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रस्ते मार्गावरील सार्वजनिक तसेच खाजगी वाहनांचा आसरा घ्ोतला. मात्र, वाहने देखील अपुरी पडल्याने प्रवाशांना तासनतास रस्त्यावर वाहनांची वाट पाहण्यात ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे ८ जुलै रोजी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.