महाकवी कालिदास दिन कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई : दिघा येथील हिंदमाता महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश डेरे यांनी ६ जुलै रोजी असलेल्या महाकवी कालिदाद दिनाचे औचित्य साधून कविता डॉट कॉमच्या संपूर्ण टीमचा शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम घडवून आणला. या कार्यक्रमात कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार प्राचार्य रवींद्र पाटील, रंगकर्मी रवींद्र औटी, लोककवी जितेंद्र लाड, कवी वैभव वऱ्हाडी, निवेदक नारायण लांडगे, कवयित्री स्वाती शिवशरण, कवी रुद्राक्ष लाड, कवी अनुकूल माळी, हिंद माता शाळेतील संपूर्ण शिक्षकवर्ग व कर्मचारी, पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी महाकवी कालिदासांचे जीवनकार्य सांगताना उत्स्फूर्तपणे निवेदन करत नारायण लांडगे यांनी कार्यक्रमात  रंगत आणली. कवी रुद्राक्ष यांनी कवी संतोष नारायणकर यांच्या आईवडील या कवितेने सुरुवात करून सगळ्यांना नात्यांचा सवांदातील आई बाबांचे नातं स्पष्ट करत लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. कवी वैभव वऱ्हाडी यांनी जीवनाचं वास्तव कवितेतून मांडलं अन स्वजीवनात आलेलं अपयश पचवून कसं पुढे जाता येतं हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं. कवयित्री स्वाती शिवशरण यांनी पावसाला साद कवितेतून साद घातली. लोककवी जितेंद्र लाड यांनी जात्यावरल्या ओव्यांपासून सुरवात करीत विद्यार्थ्यांना अनेकानेक दर्जेदार कवितांची मेजवानी दिली. रंगकर्मी रविंद्र औटी यांच्या शिवगर्जनेतून शिवगजर घडला. प्राचार्य रवींद्र पाटील सरांनी विद्यार्थ्यांना शिवाजी शब्दांचा ‘शिका वाचा आणि जिंका' हा अर्थ समजवून येणाऱ्या पिढीला संगणकापासून तर भाषेपर्यंत असलेले ज्ञान किती महत्त्वाचे हे पटवून दिले.त्यांनी महाराजांच्या कवितेतून वास्तव मांडले. कवी नारायण लांडगे सरांनी वि्ील कवितेतून वि्ीलाची थोरवी गायिली. कवी अनुकूल माळी यांनी बालपणाच्या आठवणीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवणी ताज्या करीत टवटवीत करून सोडले. तर कवयित्री सायली यांनी स्त्रीजन्म या कवितेतून तीच्या वेदना मांडल्या. लोककवी जितेंद्र लाड यांनी लोककवी प्रशांत मोरे यांच्या हाय रामा कवितेतून विद्यार्थ्यांना बोलकं व उत्साही केलं. विद्याथ्यार्ंना घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांनीहा उपस्थित राहुन कार्यक्रमाची रंगत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रेल्वे सेवा ठप्प ; प्रवाशांचे हाल