म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
हेल्मेट न घालणाऱ्या १०० चालकांवर कारवाई
तुर्भे : तुर्भे येथील वारणा चौक परिसरात हेल्मेट न घालणाऱ्या १०० दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतुक) तिरुपती काकडे यांच्या आदेशाने विशेष मोहिम अंतर्गत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ‘एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा'च्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली. या कारवाई दरम्यान शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह वाहनचालकांचेही वाहतुकीच्या नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले.
सानपाडा रेल्वे स्टेशन आणि मुंबई-पुणे महामार्गावरुन वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात येणाऱ्या दिशेने सकाळी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे आणि पादचाऱ्यांचाही प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने वारणा चौक परिसरात हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्यासह अन्य ४ कर्मचारी यांचे विशेष पथक कार्यरत होते. यावेळी दुचाकीवरुन ट्रिपलशीट प्रवास करणाऱ्या ४ वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली. याशिवाय दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौक ते आयसीएल स्वूÀल या अपघात प्रणव क्षेत्रात विशेष मोहीम राबवून २१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच अनेक वाहनचालकांचे वाहतुक नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले.
दरम्यान, सर्व वाहन चालकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केले आहे.
‘एपीएमसी वाहतुक नियंत्रण शाखा' तर्फे वाशी सेक्टर-२६ येथील नवी मुंबई विद्यालयात आरएसपी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे वाहतुक नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विमल बिडवे आणि पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांच्या हस्ते नवी मुंबई विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी १०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.