आषाढी एकादशी निमित्त खारघर मध्ये जगन्नाथ रथयात्रा

खारघर : भगवान वि्ीलाचा अवतार असलेल्या जगन्नाथाची  रथयात्रा येत्या ७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त खारघर मध्ये काढण्यात येणार असून, या रथयात्रेची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

पंढरपूर तसेच ओडिसातील पुरी या जगन्नाथ धामच्या तीर्थयात्रेला आषाढी एकादशी दिवशी जाणे शक्य होत नसलेल्या भाविकांसाठी गेल्या ८ वर्षांपासून ‘जय जगन्नाथ लोकतारण ट्रस्ट' तर्फे खारघर मध्ये जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन केल जात आहे.

जगन्नाथ रथयात्रेसाठी तब्बल १० टन वजनाचा रथ तयार करण्यात भाविक हनीफ कच्छी गुंग झाले आहेत. लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या रथाला पाच घोडे तसेच रथाच्या चारही बाजूने पारसिक देवता कोरण्यात आल्या आहेत. २४ फूट उंच आणि ३० फूट लांबी असलेला सदर रथ भाविकांचे लक्ष वेधत आहे.

मुख्य म्हणजे गेल्या १५ वर्षापासून पनवेल मध्ये राहणारे हनीफ कच्छी यात्रेसाठी रथ तयार करत आहेत. हानिफ कच्छी यांनी यात्रेसाठी रथ लाकडापासून तयार केला असून, भगवान जगन्नाथ या रथातून आपल्या मावशीकडे जाणार आहेत. प्रभूंचा रथ बनविण्याचे भाग्य लाभल्याने आपले जीवन सार्थक झाले आहे, अशी प्रतिवि्रÀया कारागिर हानिफ कच्छी यांनी व्यक्त केली.

जगन्नाथपुरी तीर्थक्षेत्र ओडिसा राज्यात आहे. परंपरेनुसार ओडिसा राज्यात भगवान जगन्नाथ बलभद्रा आणि सुभ्रदा यांची भव्य रथयात्रा आषाढी एकादशी निमित्त काढली जाते. यादिवशी प्रभू जगन्नाथ आपली मावशी गुंडीच्या देवीच्या घरी जावून नऊ दिवस राहतात. यात्रेत हजाराेंच्या संख्येने भाविक रथ ओढण्यासाठी गर्दी करतात.

खारघर येथील बालाजी अंगणमधून जगन्नाथ रथयात्रेला आषाढी एकादशी दिवशी सुरुवात होणार असून, प्रभू जगन्नाथ खारघर येथील शिवमंदिरातील मावशी गुंडीच्या देवीच्या घरी जावून नऊ दिवस राहणार आहेत. रथयात्रा निमित्त भगवंतांच्या रासक्रीडेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. ओडिशीनृत्य, गोटीनृत्य, संभलपुरी फोकनृत्य आदिंसह प्रत्येक दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ‘जय जगन्नाथ लोकतारण ट्रस्ट'चे सदस्य रत्ना पटनायक यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७ जुलै रोजी पोलीस भरती लेखी परीक्षा