शिक्षण क्षेत्रातील लूट उघडकीस आणण्यासाठी प्रत्यक्ष ट्रम्प तात्या रस्त्यावर

नवी मुंबई : नवी मुंबईतील खाजगी शाळांकडून दिवसेंदिवस आकारली जाणारी वाढीव फी आणि नियबाह्य विलंब शुक्ल सध्या प्रत्येक पालकांचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत खाजगी शाळांचे शुल्क आणि पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी होणारा खर्च पदवी शिक्षणासाठी झालेल्या खर्चाइतका आहे. राज्य सरकारने नेमलेल्या शुल्क नियंत्रण समित्या निष्क्रिय असल्याने शैक्षणिक शुल्क मोठी समस्या बनली आहे. पीई साठी लागणारी पॅन्ट ५०० रुपये असते; परंतु घाऊक बाजारात त्याची किंमत १०० रुपये देखील नाही. अशाच अनेक प्रकारे शालेय वस्तुंमध्ये पालकांची लूट होत आहे. प्रत्येक पालकाने सदर अनुभव घेतला असून नाइलाजाने त्यांनी निमुटपणे स्वीकारला आहे. याविरोधात ज्या पालकांनी जाब विचारला त्यांना विभाजकाची भावना अनुभवावी लागत आहे. तक्रार करुनही उत्तर मिळत नाही, शिक्षण विभागात कॉल करुनही प्रतिसाद नाही. नेमके पालकांनी काय करावे? अशा महत्वाच्या विषयाला वाचा फोडण्याच्या उद्देशाने एका त्रस्त पालकाने ‘अमेरिका'चे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी लक्षवेधी वेशभूषा करीत वाशी स्टेशन परिसरात एकट्यानेच सामान्य जनतेला शांततापूर्ण मार्गाने आवाहन केले.

दरम्यान वाशी स्टेशन परिसरातून सकाळी कामावर येजा करणाऱ्या बऱ्याच नागरिकांनी या विषयाला पाठिंबा व्यक्त केला. तर ‘आप-नवी मुंबई'कडून देखील सदर विषयाला पाठिंबा देण्यात आला आहे.

आज शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांकडून केली जाणारी पालकांची लूट सर्वश्रुतच आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसातील नीट आणि इतर बऱ्याच क्षेत्रातील प्रवेश परीक्षांचे पेपरफुटींचे प्रकरण देखील ताजे आहेच. त्यामुळे ईडी आणि सीबीआय सारख्या फक्त विरोधी पक्षनेत्यांना वेचून कारवाई करणाऱ्या तथाकथित स्वायत्त संस्था, खाजगी शिक्षण क्षेत्रातील माफियांचा भ्रष्टाचार का उघडकीस आणत नाहीत? असा सामान्य जनतेच्या मनात प्रश्न उत्पन्न होत असल्याचे ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सहसचिव श्यामभाऊ कदम यांनी सांगितले.

एकीकडे ‘आप'च्या दिल्ली सरकारने, दिल्लीमधील मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट बदल करुन शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. आज दिल्ली मधील मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांमधून आयआयटी, नीट सारख्या परीक्षा पास होणाऱ्या, गरीब कुटुंबातील मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्शवभूमीवर नवी मुंबई मधील खाजगी शिक्षण संस्थांची सतत वाढीत जाणारी भरमसाठ फी अनाकलनीय आहे, असे मत ‘आप'च्या नवी मुंबई संघटन मंत्री नीना जोहरी यांनी व्यवत केले आहे.

सरकारकडून स्वस्त दरात जमिनी मिळवून एखाद्या कॉर्पोरेट बिझनेस सारखी शिक्षण संस्था चालविणाऱ्या खाजगी शिक्षण संस्था, एकप्रकारे गरीबांच्या मुलांना संविधानाने दिलेल्या आरटीई कायद्याचे उल्लंघनच करीत आहेत, असा आरोप ‘आप'च्या नवी मुंबई महिला अध्यक्ष आरती सोनावणे यांनी केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील बंद वजन काट्याचा व्यापाऱ्यांना फटका