महिलांच्या संघटनेतर्फे आयोजित वृक्षारोपण मोहिमेस अन्य संस्थांचीही साथ

पनवेल : सालाबादप्रमाणे या वर्षीही ‘संवेदना निसर्ग सखी ग्रुप'ने २ जुलै  रोजी आदई डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करताना वेगवेगळ्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. या वर्षी निसर्गाप्रेमी असलेल्या संस्थेबाहेरील महिलांचीही या कामासाठी साथ मिळाली. ग्रुपने यापुढे बिज संकलन, उन्हाळ्यात झाडांना पाणी घालायला मदत करणे इ. साठी सहभागी होण्याचा मानस बोलून दाखवला.  

आदई डोंगर हिरवगार करणाऱ्या ‘पनवेल ट्रेकर ग्रुप'च्या बोराटे सर आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमध्ये कार्यरत ‘अनुभूती संस्था', ‘सिटीझन फोरम संस्थे'तर्फे देशी झाडे उपलब्ध करून दिली असल्याने हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला तसेच हे असे निसर्गात राममाण होण्याचे क्षण सर्व महिलांसाठी  ‘एनर्जी बुस्टर'पेक्षा कमी नाही असे मत या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी व्यक्त केले. बऱ्याच महिलांना इच्छा असूनही घरातील अडचणीमुळे येणे शक्य होत नाही अश्या सर्व महिलांसाठी हा ग्रुप म्हणजेच निसर्गदेवतेच्या सेवेची सुवर्ण संधी असून अश्या किमान शंभर जणांचा सक्षम ग्रुप तयार करण्याचा मानसं असल्याने पनवेलच्या जवळपास रहाणाऱ्या महिलांनी या ग्रुपमध्ये सामील होऊन योगदान देणे सुरु केल्यास एक चांगले काम उभे राहू शकते असेही यावेळी सांगण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव १५ ऑगस्ट पासून कार्यान्वित?