राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात स्मिता हर्डीकर यांना शब्दशिल्प पुरस्कार

नवी मुंबई : नेरूळ येथील कवयित्री सौ. स्मिता हर्डीकर यांना ३० जून रोजी भरवण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात दरवळ या काव्यसंग्रहासाठी शांता शेळके शब्दशिल्प पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सदर पुरस्कार वितरण ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गीतांजली वाणी, दिग्दर्शक सचिन गोखले, पत्रकार पंकज दळवी आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा येथे पार पडले. या पूर्वी हर्डीकर यांच्या अंतरंग काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ह्यांचा सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा साहित्यप्रवास विचारात घेऊन २०२३ मध्ये सर्वद फाउंडेशन तर्फेही राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वजन काटा बंद ; शेतकऱ्यांचे नुकसान